सन-१९९७/९८ मध्ये विद्यालयाची स्थापना झाली त्या वर्षी इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु करण्यात आला
त्या वर्षी इयत्ता ८ वी च्या वर्गाची विद्यार्थी संख्या मुली-२६ व मुले २७ अशी एकूण = ५३ इतकी
होती.
संस्थेचा शाळा सुरु करण्याचा उद्देश धामणगाव आवारी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इयता १ ली
ते ७ वी पर्यंतचे वर्ग असल्या मुळे पुढील शिक्षणासाठी गोरगरीब विदयार्थ्यांची गैरसोय होत होती.
तसेच या गावात अनुसूचित जमातीचे (S.T.) विद्यार्थी जवळजवळ ४०% ते/५०% असून समाजातील विद्यार्ती
शिक्षणा पासून वंचित राहाणार नाही, हा एक संस्थेचा उदात्त हेतू शाळा सुरु करण्या मागे होता.
त्यामुळे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, अकोले या संस्थेने धामणगाव आवारी, येथे विद्यालय सुरु
केले. विद्यालयाची सन-२०२३-२४ मधील एकूण विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे ८ वी =५४, ९ वी ४१,
व१० वी= ६२ एकूण = १५७ इतकी असून, अनुसूचित जमाती (S.T.) विद्यार्थ्याची ४५% संख्या आहे.